वीस वर्षे आघाडीच्या विविध वर्तमानपत्रांमध्ये पत्रकारिता केल्यानंतर आम्ही बदलत्या डिजिटल माध्यमामध्ये पाऊल टाकले आहे. TheEagle Eye या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही आधुनिक काळातील पत्रकारिता पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत.
ईगल आय मीडिया या संकेतस्थळाबरोबरच Egle Eye Media हे you tube चॅनेल सुद्धा आम्ही चालवत आहोत.
Local to global स्वरूपाच्या सर्व स्तरावरील घडामोडी टिपण्याचा, त्या आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
समाजातील वंचित, उपेक्षित घटकांचा आवाज उठवण्याला आमचे प्राधान्य असेल, या देशाचे संविधान आमच्यासाठी सर्वोच्च असून त्याच्या सक्षमीकरणासाठी, देशातील शेतकरी, कष्टकरी, युवक, कला, क्रीडा, उद्योजक, साहित्य, संस्कृती या क्षेत्राच्या समृद्ध, संपन्नतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
लवकरच आम्ही प्रिंट स्वरूपात नियतकालिक घेऊन येणार आहोत. त्या माध्यमातून ही वाचक वर्गास माहितीचा मार्ग दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
आजवर प्रिंट मीडियात काम करीत असताना आमच्या ग्रुप ला सर्व सामाजिक घटकांकडून प्रोत्साहन, पाठिंबा मिळाला आहे, हेच समर्थन यापुढे ही राहील अशी अपेक्षा आहे.
वाचकांचा अपेक्षाभंग होणार नाही, स्वीकारलेले व्रत सोडणार नाही, तत्वाशी तडजोड करणार नाही हा आम्हीच आमच्या प्रति केलेला निर्धार जपण्याची पराकाष्ठा करू,
ईगल आय संकेतस्थळ, ईगल आय मीडिया youtube चॅनेल यांच्या पाठीशी आपल्या सदिच्छा राहू द्या एवढीच अपेक्षा