टीम : ईगल आय मीडिया
शेवटच्या दिवशी नागरिकांनी आधार आणि पॅन लिंक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला . या त्यामुळे केंद्र सरकारने ही मुदत आता ३० जून २०२१ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांना आधार,पॅन लिंग करता आलेले नाही, त्यांना ३० जूनपर्यंत ते करता येणार आहे.
आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी यासाठी मोठी गर्दी झाली होती. आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
करोना परिस्थितीमुळे वाढवली मुदत करोना काळात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
त्यातच कोविड-१९च्या काळात काही भागांमध्ये लॉकडाऊन तर काही भागांमध्ये कठोर निर्बंध घालून देण्यात आले आहेत.या पार्श्वभूमीवर नागरिकांना सामना कराव्या लागत असलेल्या परिस्थितीमध्ये ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात येत असल्याचं आयकर विभागाकडून ट्वीट करून जाहीर करण्यात आलं आहे.
आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश आधारकार्ड आणि पॅनकार्ड
लिंक करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचा प्रयत्न केला.
अनेक व्यक्तींनी एकाच वेळी वेबसाईट विझिट केल्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक नेटिझन्सनी ट्वीटरवर आपल्या अडचणी शेअर देखील केल्या होत्या.
९२८४४६६५६९