माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सुचवले तीन उपाय
टीम : ईगल आय मीडिया
कोरोना महामारीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शासनाने नागरीकांना उपजीविकेसाठी रोख पैशाच्या स्वरूपात मदत करावी, उद्योग व्यवसायांसाठी सरकार समर्थित क्रेडिट गॅरंटी प्रोग्रॅम चालविण्यात यावा तसेच संस्थानिक स्वायत्तता आणि प्रक्रिया याद्वारे वित्तीय संस्थांच्या समस्या सोडवाव्यात असे मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. ईमेलद्वारे डाॅ. सिंग यांनी बीबीसी ने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कोरोना महामारी मुळे देशभरात मंदीचे वातावरण तयार होत असून याचा परिणाम हा देशाचा विकास दर ( जीडीपी) वर होणार आहे. देशात लाॅकडाऊन मध्ये हळू हळू शिथिलता आणण्यात येत असली तरी कोरोना बाधितांची संख्या ही वाढत आहे. आर्थिक घडी कधी बसणार हे अद्याप स्पष्ट नाही.
देशात लाॅकडाऊन करताना घाईगडबड करण्यात आली. यामुळे सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागला. स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा यांना योग्य ते दिशानिर्देश देऊन प्रभावीपणे उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र यामध्ये ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. आर्थिक स्थिती अडचणीची असेल तर कर्ज घेणे हे कमीपणाचे नाही. आवश्यक बाबींसाठी कर्जाची घेतलेली रक्कम खर्च करायला हवी, असेही डॉ. सिंग म्हणाले.
यापूर्वीची संकटे ही मायक्रोइकॉनोमिक संकटे होती, त्यावर मात करण्यासाठी ची साधने उपलब्ध होती. मात्र सध्याचे संकट हे महामारी चे संकट आहे, त्यामुळे समाजात निश्चितता आणि भीतीचे वातावरण आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केवळ मौद्रिक नितीचा हत्यार म्हणून वापर हा हा प्रभावी उपाय ठरू शकत नाही असेही त्यांनी सांगितले.