आजपासून दोन दिवस बँका बंद

बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

टीम : ईगल आय मीडिया

आय.डी.बी.आय. आणि दोन खासगी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात सरकारने केलेल्या घोषणेच्या विरोधात बँक कर्मचारी सोमवारपासून १५ मार्च दोन दिवसांच्या संपावर जात आहेत.


सार्वजनिक क्षेत्रातील आणि जुन्या जमान्यातील १२ बँका, खासगी, सहा विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी होत आहेत. या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात.


युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले,की या संपात राज्यातील दहा हजार पेक्षा जास्त शाखेतून काम करणारे अंदाजे पन्नास हजार बँक कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी होत आहेत. संपाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून होईल. मंगळवारी १६ मार्च रात्री बारापर्यंत हे कामकाज बंद राहील.


महामारीच्या पार्श्वभूमीवर निदर्शने, धरणे, मेळावे असे कार्यक्रम संघटितरीत्या करणे शक्य नाही हे लक्षात घेता बँक कर्मचारी तसेच अधिकारी आपल्या ग्राहकांना घरोघर तसेच व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन भेटत आहेत. याखेरीज ते आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटत आहेत.

या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी होईल.

Leave a Reply

error: Content is protected !!