सामान्य व्यावसाकिय, मजूर यांना पंढरपूर बँकेचे कर्ज वितरण
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना काळातील लॉकडाऊन नंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या, रोंजदारीवर काम करणारे कामगार, लहान-मोठे व्यावसायिकांनी आत्मनिर्भरपणे उभे राहणेसाठी बँक सर्वोतोपरी सहकार्य करेल. या प्रसंगास धैर्याने सामोरे जावे, असे आवाहन पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी केलेे. कोरोना लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या काळात पंढरपूर बँकेने रिझर्व्ह बँकेचे निकष पाळून मागेल त्याला कर्ज देणेबाबत जनता आत्मसन्मान कर्ज योजना सुरु केली आहे. आज सुमारे ५०० हून अधिक लहान मोठ्या व्यावसायिकांना प्रत्येकी रू.१०,००० ते रू.५०,००० पर्यंत असे अडीच कोटी रूपयांचे कर्ज वाटप करणेत आली.
यावेळी बोलताना चेअरमन आ.परिचारक म्हणाले, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाने मागील अनेक दिवसापासून लॉकाडाऊन जाहीर केल्यामुळे हातावर पोट असणार्यांवर अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत.लहान व्यवसायधारक व त्यांच्या कुटुंबियास गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यातून बाहेर पडणेसाठी आपले पंढरपूर बँकेने शासकीय योजना जाहीर होणेपुर्वीच सर्वसामान्य जनतेसाठी मार्ग काढीत कमीत कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. कर्जदारांनी नियमीत परतफेड करून बँकेकडे पत निर्माण केल्यास भविष्यात व्यवसायवृध्दीसाठी बँकेतर्फे आणखी कर्जाची रक्कमवाढवून देणेचे आश्वासन यावेळी आ.परिचारक यांनी दिले.
सदर प्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे, संचालक रजनीश कवठेकर, उदय उत्पात, हरिष ताठे, शांताराम कुलकर्णी, सतीश मुळे, पांडुरंग घंटी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, मुन्नागीर गोसावी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे, चंद्रकांत निकते, सोमनाथ होरणे, संचालिका सौ.रेखाताई अभंगराव, सौ.माधुरीताई जोशी, तज्ञ संचालक भालचंद्र कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक भालचंद्र जोशी व अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.