तर चांदीची चकाकी ६० हजार रु किलोवर
टीम : ईगल आय मीडिया
दिल्लीत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे, मंगळवारी ५० हजार ४९० रुपये १० ग्रॅम वर बंद झालेला सोन्याचा भाव बुधवारी सकाळी 800 रुपयांनी वाढला. बुधवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम 51 हजार 100 रुपये इतका विक्रमी वाढला आहे .
दुसऱ्या बाजूला चांदीचा भाव सुद्धा लकाकला असून चांदीच्या दरात तब्बल २५५० रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. मंगळवारी चांदीचा भाव प्रतिकिलो ५७ हजार ८५० रु किलो होता तो बुधवारी २५५० रुपये वाढून ६० हजार ४०० रुपये प्रतिकिलो झाला आहे.
सोन्या चांदीच्या दरात सातत्याने तेजी असली तरी प्रथमच सोन्याने १० ग्रॅम 51 हजार रुपयांचा टप्पा ओलंडला आहे. अमेरिका, युरोपात कोरोना विषाणूमुळे गुंतवणूकदारांचा कल सोने चांदी सारख्या किमती धातुकडे वाढल्याचा परिणाम हणून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदी चे भाव वाढले आहेत असे सराफा व्यापाऱ्यांकडून सांगितले जाते.