सोने खरेदी अवाक्याबाहेर : ५५ हजारांवर तोळ्याचा भाव

चांदी झाली ६३ हजार रुपये किलो

टीम : ईगल आय मीडिया
सोन्याच्या भावातील तेजी कायम असून महाराष्ट्रात सोन्याचा भाव प्रति तोळा ५४ हजारांवर गेला असून सोने खरेदी सर्व सामान्यांच्या अवाक्याबाहेर जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान चांदीच्या दरातही झळाळी कायम असून चांदी ६३ हजार रुपये किलो असा भाव चढला आहे.
देशभरात कोरोनामुळे आर्थिक मंदी आलेली असताना सोन्याच्या भावात मात्र विक्रमी वाढ सुरु आहे. विशेष म्हणजे मार्च पासून देशात लॉक डाऊन सुरु आहे आणि अनेक सण, उत्सवाचे दिवस गेले आहेत, त्यामुळे दुसऱ्या तिमाहीत ( एप्रिल ते जून ) सोन्याची आवक ७४ टक्के इतकी घटली आहे.
तरीही सोन्याच्या भावातील वाढ सुरूच आहे. शुक्रवारी मुंबईत सोन्याच्या भावाने ५४ हजार रुपये तोळा पातळी ओलांडली आहे तर चांदीचा भाव ६३ हजार रुपये किलोवर गेला आहे.

दक्षिण भारतात २४ कॅरेट सोन्याच्या भावातील वाढ विक्रमी पातळीवर असून ५५ हजार रुपयांपेक्षा जास्त प्रति तोळा दर झाला आहे.चेन्नई, हैद्राबाद , मदुराई , विजयवाडा, कोईमतूर, विशाखा पट्टणम, भुवनेश्वर या शहरातून सोन्याचा भाव ५५ हजार ६१० रुपये इतका झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव विविध शहरात ४९ हजार रुपये ते ५२ हजार रुपये इतका होता.
चांदीच्या भावातही वाढ कायम असून प्रति किलो ६३ हजार रुपये पर्यंत दर वाढला आहे. सोन्या चांदीची हि भाववाढ सर्व सामान्यांसाठी सोने खरेदी अवाक्याबाहेर घेऊन जाणारी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!