जनआक्रोश आंदोलनात संभाजी ब्रिगेडचा सहभाग नाही : पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पुंडे

पुणे : ईगल आय मिडिया

सोमवार १५ जून २०२० रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस कार्यालय येथे सकाळी १० ते ५ वेळेत जनआक्रोश आंदोलन संदर्भात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या नावे दोन- तीन दिवसापासून सोशल मीडिया, फेसबुक, व्हाट्सअपवर मॅसेज व डिजीटल पोस्ट फिरत आहेत. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचा सहभाग नसल्याचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुधीर पुंडे यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात पुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

पिंपळे सौदागर येथील विराज जगताप खून प्रकरण निषेधार्य असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून आमचा पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास असून आरोपींना अटक झाली आहे. त्यांना शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्था करेल, न्यायव्यवस्थेवर संभाजी ब्रिगेडचा पुर्ण विश्वास आहे. त्या अनुषंगाने
त्या आंदोलना बाबत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड-पिंपरी चिंचवड शहराची कुठलीही अधिकृत भूमिका नसून याबाबत वरिष्ठांशी सविस्तर चर्चा केली आहे . या आंदोलनात मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड,पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने कोणीही मोर्चात/आंदोलनात सहभागी होणार नाही अथवा संभाजी ब्रिगेडच्या वतीने असा कोणताही मोर्चा आम्ही आयोजित केलेला नसल्याने कुठलाही कार्यकर्ता अथवा व्यक्तीने सूचित केले असल्यास सदर बाब व्यक्तीगत समजण्यात यावी अशी माहिती महानगराध्यक्ष सुधीर पुंडे यांनी दिली.
या वेळी शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी प्रवीण बोऱ्हाडे, श्रीकांत काकडे ,विशाल गोरे ऊपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!