टीम : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 21 वा वर्धापनदिन संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुंबईतील पक्ष कार्यालयासह देशाची राजधानी दिल्लीतही पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करून पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
देशभरात कोरोना विषाणूची साथ असल्यामुळे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून सर्व कार्यक्रम करण्यात आले..
मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर राज्यभरात असलेल्या पक्ष कार्यालयात ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. रक्तदान, स्वछता, गोर गरिबांना धान्य वाटप, शालेय साहित्य वाटपासह अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.
गेल्या 5 वर्षात राज्यात पक्ष सत्तेबाहेर होता. मात्र यावर्षी 21 वा वर्धापनदिन साजरा करीत असताना पक्ष पुन्हा सत्तेत आल्यामुळे राज्यभरात कार्यकर्त्यांत मोठा उत्साह दिसून आला. सर्व आमदार, खासदार, जिल्हा, तालुका पदाधिकारी मोठ्या उत्साहाने वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. सोशल मीडिया ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलस्थान झाले असून व्हाट्स अप, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर ही पक्षाच्या वर्धापनदिन निमित्त व्हीडिओ, tiktok व्हीडिओ, शुभेच्छा संदेश, नेत्यांची भाषणे, शुभेच्छापर संदेश व्हायरल होत होते. राज्यात आजवर कोणत्याही पक्षाचा वर्धापनदिन एवढ्या उत्साहात आणि व्यापक स्तरावर झाल्याचे दिसून आले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जल्लोष दिसून आला.