दिवसभरात 2 हजार 752 नवीन रुग्ण
टीम : ईगल आय मीडिया
पुणे शहरात 18 मार्च रोजी दिवसभरात २ हजार ७५२ करोनाबाधित वाढले असून, २२ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे मोठीच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे दिसत आहे.
पुणे शहरातील एकूण करोना बाधितांची संख्या आता २ लाख २६ हजार ५६९ झाली आहे. आतापर्यंत शहरात ५ हजार २ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ८८५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर 2 लाख ४ हजार ६७० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार २९६ तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ७ जण करोनाबाधित आढळले असून, ४०६ जण करोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख १८ हजार १९२ वर पोहचली आहे. यापैकी १ लाख ७ हजार ५०२ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ८८६ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे