पुणेकरांनी देवांनाही सोडलं नाही !

मोदी मंदिराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

टीम : ईगल आय मीडिया

पुणे तिथे काय उणे हे म्हटलं जातं, ते खरं आहे. कारण आपल्या पुणेरी पाट्यांबद्दल नेहमीच सर्वांना कुतुहल असते आणि त्याची चर्चा सर्वत्र पाहण्यास मिळते. त्यामुळे खरोखरच पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. ज्या भागात आज भूमिपूजन होत आहे, या भागाला डुक्कर खिंड असं म्हटलं जातं. या भागात काही वर्षांपूर्वी रानडुकरांचा वावर जास्त असल्यामुळे असं नाव पडलं आहे, एवढंच नाही तर पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानाही सोडलं नाही अशी मिश्किल टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

काल वन विभागाच्या 35 एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पुणेरी पाट्यांची चर्चा देशभरात होत असते. त्याचसोबत पुण्यातल्या देवांची, मंदिरांची नावं हाही चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय नेहमीच ठरत असतो. नुकतंच पंतप्रधान मोदी यांचं मंदिरही पुण्यातच उभारण्यात आलं होतं. पुण्याच्या याच गोष्टींचं कौतुक पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही असल्याचं आज त्यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या या खुमासदार वक्तव्याची चर्चा पुण्यात रंगली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!