पुणे : ईगल आय मीडिया
1 मे, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्षपूर्ती निमित्त आज पुण्यात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आज महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त ध्वजारोहण अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आले. पुण्यात कोरोना ची रुग्ण संख्या चिंताजनक वाढल्याने यावेळी सोशल डिस्टनसिंग पाळून ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोयी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.