गॅस महागला : सोलापूर राष्ट्रवादीने केले लाकडांचे वाटप

केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

 सोलापूर : ईगल आय मीडिया

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून महिलांना मोफत लाकडाचे वाटप करण्यात आले. आणि केंद्रातील मोदी सरकारच्या इंधन दरवाढीचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ,हातात निषेधाचे फलक घेऊन , निदर्शने करून इंधन दरवाढीकडे केंद्रातील भाजप सरकारचे लक्ष वेधण्यात आले.या आगळ्यावेगळ्या आंदोलची नागरिकांमधून चर्चा करण्यात येत होती.
मोदी सरकार हाय हाय,भाजप सरकारचा धिक्कार असो,दरवाढीने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो,महागाई कमी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून महागाईच्या विरोधात वाहन ढकलून तसेच निदर्शने करून भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे.आता अखेरचे आंदोलन म्हणून हाच आपल्यासमोर एकमेव पर्याय असल्याने लाकूड वाटप आंदोलन करून मोदी सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी इंधन दरवाढ कमी करण्याबाबत भाजप सरकारने ठोस पावले न उचलल्यास आणखी तीव्र आंदोलन करून मोदी सरकारला नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही ,असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिला . 


केंद्र सरकारकडून पेट्रोल ,डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये करण्यात आलेल्या अवाढव्य वाढीमुळे सामान्य माणसाचे अक्षरश कंबरडे मोडले आहे.सामान्य माणूस पिचून गेला आहे. त्यामुळे गॅस वापरण्याऐवजी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याची दुर्दैवी वेळ महिलांवर आली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी प्रशांत बाबर, चेतन गायकवाड, विक्रांत खुणे, संपन्न दिवाकर ,दिपक देवकुळे, मुसा अत्तार, जहीर गोलंदाज, विजय माने, विवेक फुटाणे, इरफान शेख, इशरत नागुरे ,अल्ताफ पठाण ,सुरेश गायकवाड, रोशन वाघमारे, महेश राजगुरू, इस्माईल शेख, इम्रान शेख ,समीर मुल्ला, आसिफ गुंदगुण, मोहसीन मुजावर ,तौकीर शेरी, सरफराज बागवान, इलाही शेख, मुन्ना मुर्गीवाले, सोहेल पटेल, मुजफ्फर बागवान, मोसिन पिरजादे, शोएब बागवान ,सईद सरोडगी, गौस शेख, उमर बागवान, अलमेहराज आबादीराजे ,सोनू पटेल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!