कोरोना चाचणी अहवाल २४ तासात यावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यातील बैठकीत प्रशासकीय व्यवस्थेला कानपिचक्या

पुणे : ईगल आय मीडिया
महापालिकांच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, पुणेकरांच्या मनातील करोनाची भीती घालवण्यासाठी अधिकाधिक जनजागृती करा रुग्ण शोधून त्यांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधण्यावर भर द्यावा पुण्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवा, कोरोना चाचणी आहवाल उशिरा येणे गंभीर आहे अहवाल २४ तासात येतील याकडे लक्ष द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले .
विभागीय आयुक्तालयात करोनाच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार , जेष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदीसंह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, मुंबईप्रमाणे पुण्यातही मोठी करोना कोविड सेंटर्स उभारावीत, शासकीय यंत्रणांमधील योग्य समन्वयाने मुंबईतील करोना आटोक्यात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मोठय़ा कोविड केअर सेंटर उभारणीनंतर खाटांसाठी होणारी गैरसोय थांबेल. करोना रुग्णाला शेवटच्या क्षणी उपचार मिळण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. प्रतिबंधित क्षेत्रात कडक बंधने पाळली जातील, नियमांची काटेकोर अंमलबजावणी के ली जाईल, याबाबत लक्ष द्यावे. करोनाचे जास्तीत जास्त रुग्ण शोधणे आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याच्या कामात हलगर्जीपणा चालणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.


ग्रामीण भागातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, त्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांना सोबत घ्यावे, अशा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी या वेळी सूचना केल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!