शहरात मास्क घालणं बंधनकारक
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागला असून याला आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेकडून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नागरिकांना शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्यात जात असताना मास्क वापरणे सक्तीचे झाले आहे.
पुण्यात पहिल्यांदा एखादा व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. तोच व्यक्ती जर मास्क न घालता दुसऱ्या वेळी आढळला, तर त्याच्याकडून दुप्पट म्हणजे 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासंह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाच्या गाईडलाईन्सनुसार पुणे शहरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पुण्यात सलग दुसऱ्यांदा मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून एक हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.