पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम : न भूतो अशा उच्चांकी पातळीवर पोहोचले


टीम : ईगल आय मीडिया
मागील १४ दिवसांपासून सुरु असलेली पेट्रोल -डिझेलची दरवाढ थांबता थांबत ना असे दिसते. शनिवारी पेट्रोलच्या दरात आणखी वाढ झाल्याने महाराष्ट्रात पेट्रोल ८६ रुपये प्रति लिटर च्या पातळीवर येऊन ठेपले आहे. आजवरचा हा पेट्रोल दरवाढीचा उच्चांक आहे. . आज (शनिवार) सलग चौदाव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ कायम ठेवल्याचे दिसून आले. मुंबईत पेट्रोल ४९ पैशानी वाढून ८५. ७० पैसे प्रति लिटर तर डिझेल ७६. ११ रु. प्रति लिटर झाले. तर दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांची तर डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७८.८८ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७७.६७ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर, मुंबईत आज पेट्रोल ८५.६८ रुपये प्रति लिटर व डिझेल ७६.१ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पुण्यात पेट्रोल ८५.४१ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.६९ रुपये प्रति लिटर आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८२.२७ रूपये प्रति लिटर आणि ७५.२९ रूपये झाले आहेत, कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ८०.६२ रूपये प्रति लिटर आणि ७३.०७ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
मागील सलग १४ दिवसात पेट्रोल च्या दरात ७ रुपये ६० पैसे तर डिझेल दरात ८ रुपये पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!