१०० दलालांकडून ५५ लाखांची तिकिटे जप्त
मुंबई : ईगल आय मीडिया
लॉक डाउनच्या काळात रेल्वे मंत्रालयाने १ जून पासून २ महिन्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत.
गाड्या सुरु होण्यापूर्वीच दलालांनी ऑनलाइन तिकीट आरक्षण केल्याचे उघडकीस आले आहे. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात पश्चिम आणि मध्य रेल्वेतील सुरक्षा दलांनी मोहीम उघडली असून. मुंबई विभागात २६ जून ते १५ जुलैपर्यंत १०० दलालांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ५५ लाख रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
१ जूनपासून देशभरातून २०० रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या. यामध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील गाडय़ांचाही समावेश होता. १ जूनपासूनच्या रेल्वेगाडय़ांचे ऑनलाइन आरक्षण २१ मेपासून सुरू झाले होते. प्रवाशांना याचे तिकीट सहजरीत्या उपलब्ध व्हावे यासाठी रेल्वेने अनेक नियमही लागू केले
असले तरीही या गाडय़ांच्या आरक्षणासाठी दलालांनी अनधिकृतरीत्या तिकिटांचे ऑनलाइन आरक्षण केले.
हा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांची व्यूहरचना आखली. आरक्षण सुरू होताच २१ आणि २२ मे रोजी देशभरात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) केलेल्या कारवाईत १४ दलालांना अटक के ली.आय आर टी सी ने या दलालांना काळ्या यादीत टाकले आहे. मात्र, या कारवाईनंतरही दलालांचा काळाबाजार वाढत राहिल्याने रेल्वेकडून मोहीम हाती घेण्यात आली.
चर्चगेट ते डहाणू ते सुरत, उधना, जळगाव या पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात २४ मे ते १७ जुलैपर्यंत के लेल्या कारवाईत ८६ दलालांना अटक करण्यात आली आहे. यात सुमारे ५० लाख रुपये किमतीची २ हजार १९० रुपये तिकिटे हस्तगत करण्यात आली.
मध्य रेल्वेने १६ प्रकरणांत १४ दलालांना पकडले असून, सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीची ३१५ तिकिटे हस्तगत के ली. यामध्ये ८८ वैयक्तिक आयडीवरून तिकिटे काढण्यात आल्याने ती ब्लॉक करण्यात आली.