सिल्व्हर ओक चे 2 सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह


खा. शरद पवारांचीही कोरोना चाचणी केली

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक येथील 2 सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खा. शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


खा. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी 6 सुरक्षा रक्षक आहेत. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यातील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खा. शरद पवार यांची ही ब्रीच कॅण्डी रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेले दोन्ही ही कर्मचारी खा. पवारांच्या संपर्कात आले नव्हते. त्यामुळे काळजीचे कारण नाही. खा. पवार हे राज्यभर फिरत आहेत. त्यांनी फिरू नये अशी आपण विनंती केल्याचे ही ना टोपे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!