ग्रामीण भागात मात्र 3 ऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम
टीम : ईगल आय मीडिया
सोलापूर शहरातील कोरोना संसर्गाचा दर आता 0.75 टक्क्यावर आला आहे. शिवाय बेडचा वापर 30 टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे शहराचा समावेश पहिल्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सोलापुरात काय सुरु, काय बंद असेल ते एकदा पाहुया.
बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आता मृत्यू दरही कमी झाला आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार आजपासून शहर अनलॉक होणार असून सोलापुरातील सर्वकाही व्यवसाय, व्यवहार नियमित सुरू राहणार आहेत, मात्र शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे पूर्णतः बंद राहणार आहेत.
- विवाहकार्यासाठी पूर्वी 50 जणांची परवानगी होती आता शंभर जणांची परवानगी देण्यात आली आहे.
- अंत्यसंस्कार आता नेहमीप्रमाणे कुठल्याही संख्येच्या मर्यादेशिवाय करता येतील.
- सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत.
- मॉल, त्यातील दुकाने मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरू होणार
- जिम, सलून ,ब्युटी पार्लर, स्पा सेंटर सुरू राहणार आहेत
- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होणार आहेत.
- खासगी तसच शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.
- विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल
- अंत्यविधी ,बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधने नसतील
- रेस्टॉरंट ,हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
- परजिल्ह्यातून येणाऱ्यांना काही बंधने असणार आहेत मात्र आंतरजिल्हा प्रवासात पूर्णतः मुभा आहे.
ग्रामीण भागातील निर्बंध मात्र कायम राहणार आहेत. ग्रामीण भागामध्ये अद्यापही रोज 400 ते 500 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे अद्यापही तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू राहणार आहेत.
उद्यापासून ग्रामीण भागांमध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नाही. रुग्ण संख्या कमी झाल्यावर ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.