महापौर श्रीकांचना यन्नम यांची आयुक्तांकडे मागणी
सोलापूर : ईगल आय मीडिया
शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एका सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी थेट मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मागील काही दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंत्याकडून शहराचा पाणीपुरवठा व्यवस्थित हाताळला जात नाही ,एकाच अधिका-याकडे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्मार्ट सिटीच्या दुहेरी पाईपलाईन टाकण्याचे काम देण्यात आले आहे.
यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिका आयुक्तांकडे शहराच्या पाणीपुरवठावर एक स्वतंत्र अधिकारी द्या याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाचे सक्षम अशा ए एस उत्तसर्गी यांची नियुक्ती करावी आणि स्मार्ट सिटीच्या योजनेतून होत असलेल्या दुहेरी पाईपलाई आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामा करिता धनशेट्टी यांची नियुक्ती करावी अशी मागणी बैठकीत महापौरांनी केली.
शहर हद्दवाढ भागातील काही भागात मागील सात दिवसांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित झालेला नाही वेळेच्या माध्यमातून होत असलेल्या यामुळे सुनियोजित पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही,असं म्हणत सोमवारी महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, नगरसेवक शिवानंद पाटील, आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर कार्यालयात शहराच्या पाणीपुरवठ्यावर बैठक घेण्यात आली.