प्रत्येक घराचा सर्व्हे होणार, प्रत्येकाची नियमित तपासणी होणार
सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापूर शहरातील एकूण लोकसंख्या 10 लाख 50 हजार असून त्यामध्ये दहा लाख पन्नास हजार लोकांची सर्वे करण्यात येत असून त्यामध्ये एक लाख कॉमोरबीड लोक असून त्यांची मनपाच्या 480 टीमच्या माध्यमातून दररोज सर्व्हे करण्यात येत आहे. हे सर्व्हे कंटेनमेंट झोनमध्ये रोज करण्यात येत आहे, तर नॉन कंटेनमेंट झोन मध्ये एक दिवसाआड करण्यात येत आहे. तसेच उद्यापासून कॉमोरबीड असलेल्या/एक लाख लोकांना कार्ड वाटप करण्यात येणार असून त्या लोकांना हे कार्ड देण्यात येत आहे.
दोन महिन्यासाठी हे कालावधी असेल या कार्डच्या माध्यमातून ज्यावेळेस मनपाचे सर्व्हे कर्मचारी त्यांच्या घरी जातील त्या वेळेस त्यांची तपासणी केल्यानंतर spo2 व टेंपरेचर अजून इतर काही आजार असेल त्याची नोंदणी त्या कार्ड वरती करतील, नोंदणी केलेले कार्ड हे त्या व्यक्तीने आपल्या घरातच ठेवायचे आहे आणि ज्यावेळी पुन्हा सर्व्हे टीम त्या ठिकाणी आल्यानंतर ते कार्ड दाखवायचा आहे. कोरोनामुळे होत असलेले मृत्यू हे कमी करण्यास मदत होईल, सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता शहरातील जास्तीत जास्त टेस्ट करण्यात येत आहेत.
लोकडॉन उठल्यामुळे शहरातील बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असते त्यामुळे, त्यामुळे नागरिकांनी बाजारामध्ये अथवा दुकानात जाताना मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंगचा पालन करावे आणि शासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, गरज असेल तरच घरा बाहेर पडावे अथवा घरी सुरक्षित राहावे, असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.