11 नागरी सुविधा केंद्रे आणि 3 मोबाईल क्लिनिक्स कार्यान्वित
सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापूर महापालिकेच्या वतीने एकूण 11 नागरी आरोग्य केंद्रात तसेच 3 मोबाईल युनिट्स मध्ये एक्स रे सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहेत. सोलापूर शहरात कोविड19 या आजरा विरुद्ध मा.आयुक्त पी.शिवशंकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व महापालिका प्रशासन लढा देत आहे.
सोलापूर शहरातील महापालिका नागरी आरोग्य केंद्रामध्ये नुकतीच एक्स रे सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय ज्या भागात मृत्युदर जास्त आहे, कोविड19 या आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळणाऱ्या भागात ,विडी वर्कर, टेक्स्टाईल वर्कर्स जास्त असणाऱ्या भागात एकूण तीन मोबाईल एक्स रे क्लिनिक ची सुरुवात नुकतीच करण्यात आली. त्याची पहाणी आज महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी केली.
कोविड19 या आजाराचे लवकर व बिनचूक निदान होण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.हा उपक्रम इतर शहरांसाठी पथदर्शी ठरणार आहे.या मोबाईल क्लिनिक मध्ये वैद्यकीय सुविधेसह रॅपिड अँटीजन टेस्टिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या क्लिनिकचे आठवड्याचे वेळापत्रक केले असून या नियोजनाप्रमाणे या क्लिनिक ची सुविधा नागरिकाना मिळेल.याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.याकामी सर्व सन्माननीय सदस्यांनी आपापल्या प्रभागात या सुविधेचा लाभ घेऊन प्रभाग कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी मनपा उपायुक्त धनराज पांडे,डॉ.मंजिरी कुलकर्णी, डॉ.संस्कृती वळसंगकर यांच्यासह मोबाईल क्लिनिकचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.