सोलापूर मनपाचे आयुक्त पी.शिवशंकर यांची माहिती
सोलापूर : ईगल आय मीडिया
गेल्या सहा महिन्यापासून सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती कमी झाली आहे आणि महानगरपालिकेच्या सुद्धा आर्थिक परिस्थिती घटलेली आहे.त्यामुळे महापालिकेचा (टॅक्स) कर संकलन या विभागावर परिणाम झाला आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने टॅक्स थकबाकीदार यांच्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर मनपा चे आयुक्त पी शिव शंकर यांनी दिली.
या योजनेमध्ये शहरातील टॅक्स थकबाकीदार ज्यांच्या टॅक्सवरती शास्ती लावण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात प्रॉपर्टी टॅक्स भरल्यास 80 टक्के शास्तीकर तर डिसेंबर महिन्यात प्रॉपर्टी टॅक्स भरल्यास 70 टक्के व जानेवारी महिन्यात प्रॉपर्टी टॅक्स भरल्यास 60 टक्के आणि मार्च महिन्यात प्रॉपर्टी टॅक्स भरल्यास 50 टक्के टॅक्स वरील शास्तीवर सवलत देण्यात येणार आहे.
तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी ज्यांचे प्रॉपर्टी टॅक्स थकीत आहेत त्यांनी नोव्हेंबर महिन्यात भरावे प्रोपर्टी टॅक्स भरून या योजनेचा लाभ घ्यावा. कोरोनाचा पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आर्थिक बळकटीकरण साठी मदत होईल तसेच सोलापूर शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी केले आहे.