महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी मूर्ती द्याव्यात : महापौर सौ. यन्नम
सोलापूर : ईगल आय मीडिया
गणेश विसर्जन करिता पालिका प्रशासना कडून नियोजन करण्यात आले आहे, गणेश मुर्तीचे विसर्जन करताना विटंबना होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. सोलापूर शहरातील नागरिकांनी गणपतीची विसर्जन आपल्या घरातच करावे घरात शक्य नसल्यास महापालिकेने नेमलेल्या ठिकाणी गणेश मूर्ती संकलन साठी द्यावे. गणेश भक्तानी देखील पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापौर श्रीकांचन यन्नम यांनी केले .
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जन साठी नियोजन करण्यात आलेल्या ठिकाणाची पहाणी करण्याकरिता महापौर श्रीकांचन यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली,मध्यवर्ती गणेश उत्सवाचे अध्यक्ष नरसिंग मेंगजी,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,नगर अभियंता संदिप कारंजे आदीनी विसर्जन कुंडाची पहाणी केली.
महापालिकेच्या वतीने मंगळवारी होणा-या गणेश विसर्जन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून तुळजापूर रोड जवळील एका खाणीचा वापर करण्यात येणार असून या खाणीतील पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे, शिवाय मानवी साकळी पद्धतीने गणेशाच्या मुर्तीचे विधीवत शास्त्रशुद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे, गणेश विसर्जन सोहळ्या करिता पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा शहरातील गणेश भक्तांनी लाभ घ्यावा आणि निर्विघ्नपणे विसर्जन सोहळा पार पडावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी यावेळी केले.
अधिकाधिक सुखद आणि सर्वाना सोईचे होईल असे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगून गणेश मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष नरसिंग मेंगजी यांनी व्यक्त केले.
यावेळी मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी व महापालिका अधिकारी उपस्थित होते.