सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम
सोलापूर : ईगल आय मीडिया
महानगरपालिका परिवहन विभागाच्या 6 मोबाईल क्लिनिक बसेस मधून रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू केल्या आहेत. या बसेस चा शुभारंभ महापौर कांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्यावतीने दीड महिन्या खाली आरोग्य तपासणीसाठी मोबाईल क्लीनिकची उभारणी करण्यात आली होते. या मोबाईलच्या क्लिनिकच्या माध्यमातून सोलापूर शहरातील कंटेनमेंट झोन, नॉन कंटेनमेंट झोन येथील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच या मोबाईल क्लिनिकचा माध्यमातून प्रत्येक प्रभागात तपासणीसाठी वाढती मागणी पाहता परिवहन विभागाकडून अजून 6 बसेस आरोग्य तपासणी व रॅपिड अँटीजन टेस्ट साठी मोबाईल क्लिनिक म्हणून तयार करण्यात आल्या आहेत. त्या बसेसची पाहणी आज महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले.
या मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिक, तसेच कंटेनमेंट झोन, नॉन कंटेनमेंट झोन येथील नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून या बसेसच्या माध्यमातून रॅपिड अँटीजन टेस्ट सुद्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर श्रीकाचंना यन्नम यांनी दिली.
यावेळी परिवहन सभापती जय साळुंखे यांनी या बसच्या माध्यमातून सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रत्येक प्रभागातील रुग्णांची तपासणी करण्यात सोयीस्कर होणार आहे आणि कोरोनावर लवकरच मात करण्यात येईल अशी माहिती दिली.
यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी, सोलापूर शहरात मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून विविध भागात तपासणी करण्यात येत असून मागणी वाढल्यामुळे परिवहनच्यावतीने 6 बसेस कोरोना चाचणीसाठी घेण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरात ज्यावेळी मोबाईल क्लिनिक येतील तेव्हा आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिक तसेच रॅपिड एंटीजन टेस्ट घेण्यासाठी नागरिकांनी समोर येऊन तपासणी करावी असे आवाहन केले.
यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली,परिवहन सभापती जय साळुंखे, परिवहन सदस्य अशोक अण्णा यानगंटी, बाळासाहेब आळसांदे, गणेश जाधव, परीवहन व्यवस्थापक लिगाडे तसेच वर्क्स मॅनेजर पाडगावनूर उपस्थित होते.