कोरोनामुळे मयत सफाई कामगाराच्या वारसास 50 लाख अनुदान द्या

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी

सोलापूर : ईगल आय मीडिया

कोरोनाच्या पादुर्भावामध्ये मृत्यू झालेल्या झाडूवाले सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रुपये अनुदान, तसेच ड्रेनेज साफ करताना मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येकी दहा लाख रुपये नुसकान भरपाई अदा करावी, आणि कोरोनाचा उपचार घेण्यासाठी मनपा कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल असावे, अशा मागण्या सोलापूर महानगरपालिकेकडे करण्यात आल्या आहेत.

सोलापूर महानगरपालिका कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या व इतर संघटनांसोबत आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त पंकज जावळे, उपायुक्त अजयसिंह पवार, उपायुक्त धनराज पांडे, मुख्यलेखापाल शिरीष धनवे तसेच कामगार कृती समितीचे अशोक जानराव, प्रदीप जोशी, बापू सदाफुलें,बाली मंडेपू,अजय शिरसागर,शशिकांत सिरसट, माऊली पवार,उमेश गायकवाड तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये रोजंदारी कर्मचारी कायम करण्याबाबत,लार्ड कमिटी आणि अनुकंप मजूर त्वरित पद भरावे तसेच कोरोनाच्या पादुर्भाव मध्ये मृत्यू झालेल्या झाडूवाली यांच्या वारसांना 50 लाख रुपये अनुदान तसेच ड्रेनेज साफ करताना मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येकी दहा लाख रुपये नुसकान भरपाई अदा करावी आणि कोरोनाचा उपचार घेण्यासाठी मनपा कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्पिटल असावे. आशा वर्कर ,घंटागाडी कामगार, बायोमेट्रिक, कर्मचाऱ्यांच्या परीक्षेबद्दल आदी विषयांवर चर्चा करण्यात आले.

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी उपस्थिती केलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. आपण दिलेल्या निवेदना प्रमाणे आयुक्त यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

आयुक्त पी.शिवशंकर यांनी कर्मचाऱ्यांच्या परीक्षा हे होणार असून या परीक्षेत जे पास होतील तर बरे जे नापास होतील त्यांच्यासाठी पुन्हा एक महिन्याचा कालावधी दिला जाईल, त्यानंतर त्यांची संगणक व टाइपिंगची परीक्षा घेण्यात येईल. कर्मचाऱ्यानी बायोमेट्रिक आपल्या कार्यालयात करावे अथवा फोटो काढावे जेणे करून हजेरी लागेल आणि जे कर्मचारी तीन वर्षा पेक्षा जास्त काळ एक कार्यालयात असतील, अशा कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदली लवकरच करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!