सोलापुरात राष्ट्रवादी’च्या प्रभाग जनसंवाद यात्रेला सुरुवात

महेश कोठे, तौफिक शेख यांची उपस्थिती

सोलापूर : ईगल आय मीडिया

येणाऱ्या सोलापूर महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील जनतेसोबत राष्ट्रवादी पदाधिकारी नेते यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संवाद करण्याच्या उद्देशाने शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या संकल्पनेतून प्रभाग निहाय जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आज रोजी शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 1 मड्डी वस्ती येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राष्ट्रवादीच्या या जनसंवाद यात्रेला नगरसेवक तोफिक शेख व नगरसेवक तथा माजी महापौर महेश अण्णा कोठे यांची लक्षणीय उपस्थिती राहिली.


यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव यांनी 2022 मध्ये होणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले असून कोणत्याही परिस्थितीत महापालिका मध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणून राष्ट्रवादीचाच महापौर करायचा असा चंग सर्व पदाधिकाऱ्यांनी बांधला असल्याचे सांगितले.

तर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी संबोधित करताना सांगितले की, सध्याच्या स्थितीला शहरात राष्ट्रवादीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू असून शहरात १३०० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने एक वेगळेच वातावरण तयार झाले आहे, ते पक्षाच्या दृष्टीकोनातून सकारात्मक असल्यामुळे जनतेचा विश्वास मिळवून जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे.


माजी महापौर महेश अण्णा कोठे यांनी, गेल्या ५ वर्षात सोलापूर महानगरपालिकेमध्ये फसव्या भाजपाची सत्ता जनतेसाठी त्रासदायक ठरत असून गेल्या ४ वर्षात एकदाही शहराचे बजेट सत्ताधिकाऱ्यांना मांडता आले नाही, स्मार्ट सिटीच्या नावाखाली भोंगळ कारभार महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपाकडून चालला आहे, असा आरोप केला. या मुजोर सत्ताधारी पक्षाला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत घरचा रस्ता दाखवून जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून देऊन महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याचे आवाहन केले.

यावेळी तौफिक शेख यांनी विशेष नमूद करताना सांगितले की, राष्ट्रवादीचे आम्ही सर्व नेते पदाधिकारी हे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेचा विश्वास संपादन करून महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता मिळवणारच.

यानंतर मार्गदर्शनपर भाषणात माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी महापौर मनोहरपंत सपाटे तसेच प्रभागातील वकील सेलचे अंकलगी, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष नगरसेविका सौ सुनिता रोटे, युवती शहराध्यक्ष आरती हुळले, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वक्ता सेलचे शहराध्यक्ष नागेश निंबाळकर तर आभार प्रदर्शन पर्यावरण सेल शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पद्माकर (नाना) काळे, अजित बनसोडे, अनिल बनसोडे, शफी इनामदार, लताताई फुटाणे, बाबासाहेब जाधव, लताताई ढेरे, मिलिंद गोरे, अमीर शेख, तनवीर गुलजार, निशांत सावळे, बसवराज कोळी, हरीभाऊ पवार, रवींद्र सरवदे, गफूर शेख, सरफराज शेख, रुपेश भोसले, प्रमोद भोसले, चेतन गायकवाड, सागर शितोळे, युवराज माने, ज्योतिबा गुंड, आशिष जेटीथोर, चंद्रकांत पवार, महिपती पवार, अमोल कुलकर्णी, आयुब पठाण, गौरव जक्कापुरे हे प्रमुख पदाधिकारी तसेच प्रभाग 1 मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी सिद्धेश्वर अंबट, प्रकाश झाडबुके, शिवराज विभुते, शशी डोलारे, अजित साळुंखे, संजय जाबा, मोबीन भेलमे, मोहम्मद जीना शेख, अफरिन पटेल, उमर दलाल, अभिषेक बच्चल, मंगल सोनकांबळे, रवि गुब्याडकर, लक्ष्मण विटकर, अमोल कळम, श्रीकांत गायकवाड, विशाल वरगंती, शिवराज वळसंगकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने पावसात देखील उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!