भोसे येथे दूध भेसळ : एकाच टोळी विरोधात चौथ्या वेळी गुन्हा दाखल

करकंब पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल : आरोपीच्या अटकेसाठी आज भोसे पाटी येथे रास्ता रोको

पंढरपूर
भोसे ( ता. पंढरपूर ) येथील दूध भेसळ करणाऱ्या फॅक्टरीवर अन्न व औषध आणि पोलीस प्रशासनाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत दूध भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या भेसळखोर टोळीचा मुख्य सूत्रधार दत्ताञय जाधव याच्याविरोधात चौथ्या वेळी गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, या भेसळखोर टोळीतील सर्व आरोपीना अटक करण्यात यावे, त्यांच्याविरुधात संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. महादेव तळेकर यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर तालुक्यातील भोसे हद्दीतील एका दूध संकलन केंद्रात दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न औषध प्रशासन आणि पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री दूध संकलन केंद्रावर जाऊन छापा टाकला असता भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. यामध्ये भारतात बंदी असलेले व नागरिकांच्या शरीरास अपायकारक असलेले मेलामाईन हे रसायन आढळून आले. तसेच १३ लिटर दूध, मिल्क पावडर, २८ पोटी वेस्टनेट पावडर, रिफाइंड तेल

यावेळी घटनास्थळी 13 लिटर दूध, (किंमत रु. 390), स्किम्ड मिल्क पावडर (अपमिश्रक) 28 पोती (699 किलो, किंमत रुपये 61 हजार 512), व्हेपरमिट पावडर (अपमिश्रक) (62 किलो, किंमत रुपये 5,368), रिफाईण्ड पामोलिन तेल (अपमिश्रक) (124.1 किलो, किंमत रुपये 23,506), अज्ञात पांढरे केमिकल द्रव (अपमिश्रक) (23 लिटर, किंमत रुपये 4,600), होल मिल्क पावडर (560.5 किलो, किंमत रुपये 98,648) असा एकत्रित एक लाख 94 हजार 24 रुपये किंमतीचा दूध भेसळीसाठी लागणारा कच्चा माल जवळ बाळगून दुधात भेसळ करताना आढळून आले आहे.

या प्रकरणी करकम्ब पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी दत्तात्रय जाधव, सचिन फाळके, अनिकेत कोरके या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दत्तात्रय जाधव याच्याविरोधात यापूर्वी तीन वेळा दूध भेसळीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तरीही जाधव आणि त्याच्या भेसळखोर टोळीने आपला भेसळीचा उदयोग सुरूच ठेवलेला आहे.

चौकट
कारवाईच्या मागणीसाठी आज रास्ता रोको दरम्यान स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक महादेव तळेकर यांनी याप्रकरणी दोषी आरोपीवर कठोर कारवाई करावी व दुधाला दरवाढ मिळून मिळावी या मागणीसाठी आज (रविवारी) भोसे पाटी येथे रास्ता रोको पुकारलेला आहे. दत्तात्रय जाधव हा सराईत भेसळखोर असून त्याला मोका लावण्यात यावा व दूध भेसळीचे प्रकार कायमचे बंद करण्यासाठी दुधाला दरवाढ देण्यात यावी, अशी मागणी प्रा. तळेकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!