पंढरपूर ; EAGLE EYE NEWS
अनवली ( ता. पंढरपूर ) येथे मंगळवारी रात्री एका घरातून चोरट्याने २ लाख ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे.
अनवली येथील सिद्धनाथ हरी भोसले (वय ३५, रा.अनवली, ता. पंढरपूर) हे नेहमीप्रमाणे घराचा दरवाजा पुढे करून घरात कुटुंबीयांसह मंगळवारी रात्री झोपले होते. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांना दरवाज्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. घराला आतून कडी नसल्याने त्यावेळी त्यांना एक इसम घराचा दरवाजा पुढे करून जात असल्याचे दिसले. त्यांनी कोण आहे रे म्हणताच तो इसम तेथून पळत सुटला. भोसले यांनी आरडा-ओरडा करत त्याचा पाठलाग केला.
यामध्ये दीड तोळे सोन्याचे नेकलेस, एक तोळे सोन्याचे मनी मंगळसूत्र, एक तोळे सोन्याचे कानातील झुबे, अर्धा तोळे सोन्याचे कानातील वेल, अर्धा तोळे सोन्याचे गळ्यातील ठुशी, अर्धा तोळे सोन्याचे लॉकेट, तीन ग्रॅम सोन्याचे बदाम, अडीज ग्रॅम सोन्याची आंगठी, तीन ग्रॅम सोन्याच्या लहान आंगठ्या असे एकूण २ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे सोने पळवून नेले आहे.
यावेळी त्यांच्या शेजारी राहत असलेले नागरिक देखील घरातून बाहेर आले, आणि त्या चोराचा पाठलाग करू लागले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो चोर मक्याच्या शेतातून पळून गेला.
त्यानंतर भोसले यांनी घरात येऊन पाहिले असता घरातील लोखंडाच्या कपाटातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे दिसून आले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.