100,000 रुपयांच्या लाच प्रकरणात सपोनि सह दोघांना अटक

विटा पोलीस ठाण्याच्या सपोनि दीड लाखांची केली होती मागणी

टीम : ईगल आय मीडिया

वाढीव पोलीस कोठडी घेऊ नये आणि गुन्ह्यात सहकार्य करावे यासाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 1 लाख रुपये स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एक पोलीस कॉन्स्टेबल आणि एक खाजगी इसम या तीन जणांना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचुन रंगेहाथ पकडले आहे.

प्रदीप पोपट झाल्टे, ( सहा. पो. निरीक्षक वर्ग 2, विटा पो. स्टेशन)
विवेक पांडुरंग यादव ( वय 28, पो.कॉ. ब.न.241 विटा पो.ठाणे, रा. कडेगाव जि.सांगली ) आणि अकीब अल्ताफ तांबोळी ( वय 23, रा. विटा ) खाजगी इसम अशी कारवाई झालेल्या तीन जणांची नावे आहेत.


या प्रकरणात तक्रारदार यांचे मालक विटा पो.ठाणेतील एका गुन्ह्यात अटकेत आहेत. त्यांची वाढीव पो. कोठडी घेऊ नये व गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे api झालटे, पो कॉन्स्ट.यादव यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती.

यासंदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क साधला होता. आरोपींना तडजोडी अंती आरोपी क्र.3 खाजगी इसम यांचेहस्ते 1 लाख रूपयांची लाच स्विकारली असता आरोपी क्र. 2 व 3 यांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने विटा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!