बाभूळगावात शेतीच्या बांधावरून हाणामारी : 1 जण ठार

तिघेही जखमी अवस्थेत रुग्णालयात गेले त्यापैकी एकाचा मृत्यू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शेतीच्या बांधावरून असलेल्या जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत 3 जण जखमी झाले. तिघेही जखमी अवस्थेत रुग्णालयात गेले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास बाभूळगाव ( ता . पंढरपूर ).येथे घडली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लालू शिंदे ( वय 35 वर्षे ) आणि आणि हरी पवार ( वय 65 वर्षे ) यांची बाभूळगाव येथे शेती आहे. दोघांच्यामध्ये बांधावरून जुना वाद आहे. त्याच वादातून शुक्रवारी सकाळी शेतातच लालू बबन शिंदे आणि हरी कृष्णा पवार त्याचा मुलगा बाळू हरी पवार यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये तिघेही जखमी झाले. जखमी अवस्थेतील लालू शिंदे अगोदर तालुका पोलीस ठाण्यात गेला आणि तिथून उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाला तर पाठोपाठ हरी पवार आणि त्याचा मुलगा बाळू पवार जखमी अवस्थेत सामान्य रुग्णालयात दाखल झाले. येथील डॉक्टरनी हरी पवार मयत झाल्याचे सांगितले.

याबाब तालुका पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. 4 ) रोजी सकाळी 09:30 वाजता च्या सुमारास फिर्यादी बाळू हरी पवार हा व त्याचे आई-वडील शेतातील घरी असताना आरोपी लाला बबन शिंदे ( रा. बाभुळगाव ) यांनी पूर्वी दिलेल्या(2016) तक्रारीच्या कारणावरून भांडण काढले. हरी कृष्णा पवार यांना” हऱ्या तुला आज ठेवत नाही” असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करीत त्यांच्या हातातील दगड व शेजारी पडलेले दगड उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकून मारले. त्यात फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर व पोटावर जखम झाली आहे. त्याबाबत फिर्यादी पंढरपूर तालुका पोलीस ठान्यास त्याच्या वडिलांसोबत तक्रार देण्याकरिता मोटरसायकलवरून येत असताना आरोपी लाला शिंदे याने देगावच्या शिवारातील गणेश गांडुळे यांच्या शेताजवळ 11 च्या सुमारास मोटरसायकलला त्याची मोटरसायकल आडवी लावली. कोयता घेऊन “हाऱ्या तुला आता जित्ता सोडत नाही “असे म्हणत हातातील कोयत्याने हरी पवार यांच्यावर कोयत्याने वार केले. फिर्यादी बाळू पवार याच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या दरम्यान बाळू हरी पवार याने लालू शिंदे यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स. पो. नि. खरात हे पुढील तपास करीत आहेत.

One thought on “बाभूळगावात शेतीच्या बांधावरून हाणामारी : 1 जण ठार

  1. दोघंही शेतकरी मुळ कागदपत्रे सादर आसणारी जागा मोजणी करून वाद मिटला आसता.
    पण काही दळभद्री शेजारी आयकत नाही
    हा विषय आहे.
    खुप दिवस वाद करून.
    काय भेटले दोघांच्या पदरात

Leave a Reply

error: Content is protected !!