भाजप नगरसेविकेच्या मुलाचा गोळी लागल्याने मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याने पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसन्न चिंचवडे (21) असे त्या मुलाचे नाव आहे. काल ( 28 मार्च ) रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या राहत्या घरात हा सर्व प्रकार घडला.

चिंचवडमधील वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात करुणा चिंचवडे यांचा बंगला आहे. या बंगल्यात त्यांचे एकत्र कुटुंब राहत होते. रात्री नऊच्या सुमारास सहकुटुंब जेवणानंतर प्रसन्न वरच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याच्याकडे वडील शेखर चिंचवडे यांची परवानाधारक बंदूक होती.

यानंतर काही वेळाने अचानक बंदूकीचा आवाज आला. यानंतर घरातील कुटुंबियांनी तातडीने वरच्या खोलीत धाव घेतली. त्यावेळी प्रसन्न जखमी अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र प्रसन्न यांना नेमकी गोळी नेमकी कशी लागली? याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच करुणा चिंचवडे यांच्या समर्थकांनी गर्दी केली. 

Leave a Reply

error: Content is protected !!