मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील अमानुष घटना
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मुलीस पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून मुलाच्या वडीलास गावातील भर चौकात झाडाला बांधून मारहाण केल्याचा अमानुष आणि धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे घडला आहे. दरम्यान पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भाळवणी येथील एक तरुण मुलीने तिच्या घराशेजारच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे. या घटनेचा राग त्या मुलीचे संबंधित नातेवाईक व त्यांच्या भावकीला होता. त्याच रागातून मुलाच्या वडिलास त्याच्या घरापासून दोरीने बांधून सुमारे 3 की.मी वरून गावापर्यंत मारहाण करत आणले. व गावातील भर चौकात लिंबाच्या झाडाला बांधून आणखीन मारहाण करण्यात आली.
दरम्यान या घटने नंतर काही क्षणात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चौघाला जणांना ताब्यात घेतले असून इतर सहभागी आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.