पंढरपूर पोलिसांनी 19 दुचाकीसह 2 चोरटे पकडले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरासह विविध भागात चोरी केलेल्या 19 मोटारसायकली आणि संबंधित 2 चोरटे यांना पकडण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिसांत 29 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र पोलीसांनी अधिक तपास करून चोरी गेलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात यश मिळाले आहे.

विठ्ठल हनुमंत चौगुले ( वय 35 वर्षे, रा. भोसे, ता. पंढरपूर ) आणि नामदेव बबन चुनाडे ( वय 48 वर्षे, रा.अनिलनगर पंढरपूर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहर पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठल चौगुले आणि नामदेव चुनाडे यांनी या मोटारसायकली चोरल्या आहेत.या 19 मोटारसायकल आणि दोन्ही आरोपी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पुढील तपास पोलिस नाईक प्रसाद औटी हे करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!