टॉवेल लावून शिकवायचा, ग्रुपवर अश्लील लिंक share करायचा.

शिक्षकावर विद्यार्थ्यांनी केला लैंगिक छळाचा आरोप

टीम : ईगल आय मीडिया

चेन्नईतील एका नामांकित शाळेच्या शिक्षकावर लैंगिक छळ केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. पोलिसांनी या प्रकरणाबाबत चौकशी केली असता अनेक विद्यार्थ्यांनी या शिक्षकाबाबत तक्रार केली होती.
त्यानंतर या शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.


पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे. शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यीनीने शिक्षकावर लावलेले आरोप तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर तिने ज्यासोबत असा काही प्रसंग घडला आहे त्यांना पुढे येण्यास सांगितले होते. त्यानंतर अनेक विद्यार्थिनींनी पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडल्या. राजगोपालन नावाचा शिक्षक फक्त टॉवेल गुंडाळून ऑनलाईन वर्गात शिकवतो असा आरोप त्यांनी केला आहे.


त्या दरम्यान काही विद्यार्थ्यांना तो व्हेरी क्युट असा मेसेज पाठवत असत. तसेच त्यांच्या प्रोफाईल फोटोवर कमेन्टं देखील करत असत.
अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. एका विद्यार्थीनीने त्या शिक्षकाच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये शिक्षक तिला चित्रपट पाहायला जाण्यासाठी विचारत आहे. त्या मुलीने विरोध केल्यानंतर त्याने तो मेसेज डिलीट केला. एका विद्यार्थीनीने त्या शिक्षकाने अश्लील चित्रपटाची एक लिंक त्यांच्या ग्रुपवर पाठवल्याचे सांगितले.


रात्री उशिरा व्हि.डि.ओ. कॉलवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज केल्याचा आरोपही विद्यार्थीनींनी केला आहे. विद्यार्थ्यांसोबत या शिक्षकांचे व्हाट्सएप मेसेजचे अनेक स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाकडे अनेक तक्रारी केल्या. त्यावर व्यवस्थापनाने त्या शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला असा आरोप विद्यार्थानींनी केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!