मयत महिला : प्रभावती कदम
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर येथे सावत्र आईचा रिक्षा चालक मुलानेच धारदार शास्त्राने खुन केल्याचे उघडकीस आले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत आणि पुढील कारवाई सुरू आहे.
शहरातील संत गजानन महाराज मठाच्या मागील बाजूस असलेल्या लक्ष्मी नगर येथील प्रभावती मधुकर कदम ( वय 45 वर्षे ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
या महिलेच्या पतीचे 1 महिन्यापूर्वी कोरोनमुळे निधन झाले असून व्यसनाधीन सावत्र मुलगा रिक्षा चालवत होता. त्याचा आणि सावत्र आईचा सतत वाद होता त्यातूनच चिडून त्याने हे कृत्य केल्याचे समजते. प्रभावती कदम यांचा खून करून आरोपी संजय कदम याने घराला बाहेरून कडी लावली आणि निघून गेला.
थोड्या वेळाने मयत प्रभावती यांची मुलगी आल्यानंतर तिने कडी काढताच हा प्रकार उघडकीस आला. मयत महिलेस दोन सावत्र मुले आणि एक मुलगी आहे. आरोपी चा पोलीस शोध घेत आहेत.