१० हजाराची लाच : सर्कल लुचपत खात्याने रंगेहात पकडला

उताऱ्यावर विहिरींची नोंद झाली : कमी करण्यासाठी लाच मागितली.

टीम : ईगल आय न्युज
शेत जमिनीवर चुकून झालेली विहिरीची नोंद कमी करून देण्यासाठी शेतकऱ्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली आणि प्रत्यक्षात १० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सर्कल यास रंगेहात पकडले आहे. अशोक चिंघू गुजर,( मंडळ अधिकारी, वाघाडी ,ता.शिरपुर ) यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तकारदार हे मौजे वकवाड, ता. शिरपुर येथील रहीवाशी असुन त्यांची मौले वकवाड येथे वडीलोपार्जित शेत जमिन आहे. सदर शेत जमिनीमध्ये विहीर नसतांना ७/१२ उता यावर चुकीने विहिर असल्याची नोंद झाली. तक्रारदार यांना शेत जमिनीत विहिरी साठी शासकीय अनुदान मंजुर होण्यासाठी अर्ज करता येत नव्हता . त्यामुळे त्यांनी ७/१२ उता – या वरील चुकीने झालेली विहीरीची नोंद कमी करण्यासाठी तलाठी वकवाड यांच्याकडे अर्ज केला असता तलाठी याने सुमारे ५ महीन्यांपूर्वी विहिरीची नोंद कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेतलेली आहे. सदरची नोंद ही मंडळ अधिकारी यांनी मंजुर केल्या शिवाय विहिरीची नोंद कमी होत नसल्याचे सांगितले.

त्यानंतर तकारदार यांनी वेळो – वेळी मंडळ अधिकारी अशोक गुजर यांना भेटुन त्यांना विहीरीची नोंद कमी करणेबाबतची फेरफार नोंद मंजूर करणे बाबत विनंती केली असता, मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेत जमिनी संदर्भात यापूर्वी केलेल्या हक्कसोडच्या कामाचे बक्षीस म्हणुन तसेच ७/१२ उता यावर चुकुन झालेल्या विहीरीची नोंद कमी करण्याबाबतची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार दि.०८. मे रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती . सदर माहितीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता.

तडजोडी अंती १० हजार रुपये रक्कम ठरली होती. लाचेची हि रक्कम त्यांचे शिरपुर येथील मिलींद नगर मधील राहते घरी घेवुन येण्यास सांगीतले होते. मंगळवारी ( दि.०९ ) रोजी मंडळ अधिकारी अशोक गुजर यांच्या शिरपुर येथील राहते घरी सापळा लावला आणि यांच्याकडून १० रुपये लाच स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन ९ ८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.


तक्रारदार सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री . अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री मंजितसिंग चव्हाण, तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, गायत्री पाटील मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे . सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा . शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा . श्री . नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्फत तपास सुरु आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!