घटस्फोटास नकार देणाऱ्या पत्नीला कोरोना

नवऱ्याने उपचारास जाणीवपूर्वक विलंब केला : न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला


पंढरपूूूर : ईगल आय मीडिया

लग्नानंतर मुलगीच झालेल्या पत्नीला नवऱ्याने घटस्फोट मागितला हित,मात्र तिने नकार दिला. दुर्दैवाने त्या पत्नीला कोरोना झाला आणि आयतीच संधी साधून नवऱ्याने तिच्यावर वेळेवर उपचार न करता तिला मरणाच्या दाढेत ढकलून दिले. दरम्यान या प्रकरणात मयत महिलेच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली असता नवऱ्याने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. कर्नाटकच्या वैद्यकीय खात्यातील लिंगराज दामू पवार, (रा. तुकाई नगर, मंगळवेढा) असे त्या नवऱ्याचे नाव आहे.

या खटल्याची माहित अशी की, आरोपी लिंगराज दामू पवार याचा विवाह २००५ साली उमा शंकर चव्हाण, (रा. सोलापूर) यांची मुलगी अश्विनी हिच्याबरोबर झाला होता. लग्नानंतर अश्विनी हिस मुलगी झाली. मुलगी झाल्याने पती नाराज झाला व त्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली. पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पती लिंगराज याने पत्नीचा छळ सुरू केला.

पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली, परंतु पत्नीने घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्याने सतत मारझोड करून तिचा अनन्वित छळ केला. दरम्यान, एप्रिल २०२१ मधील पहिल्या आठवड्यात पत्नीस करोनाची लागण झाली. परंतु पतीने मुद्दाम तिला उपचारासाठी नेले नाही. सासू-सासरे व शेजारच्या मंडळींनी उपचारासाठी नेण्यासाठी तगादा लावल्याने मंगळवेढा येथील डॉक्टरकडे नेले. त्या डॉक्टरांनी रूग्णाची प्रकृती गंभीर असल्याने सोलापूरला रूग्णालयात नेण्यास सांगितले तरी टाळाटाळ केली. आणि खूप दिवसांनी विजापूरला उपचारासाठी नेले, जाताना वाटेत मुद्दाम भर उन्हात गाडी चार तास उभी करून विलंबाने विजापूरला नेले.

तेथील डॉक्टरांनी बेळगाव येथील दवाखान्यात नेण्यास सांगितले असता करोनाने पत्नी मरावी म्हणून अनेक दिवस उपचारासाठी बेळगावला नेले नाही. पत्नी शेवटचा घटका मोजत असताना खूपच उशिरा बेळगाव येथे नेले आणि तेथे तिचा मृत्यू झाला. अश्विनी हिची आई शिक्षिका उमा शंकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीचे आधारे आरोपीविरुद्ध भिरतीय दंड विधान कलम ३०४ (१), ४९८ ( अ) अन्वये मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पत्नीस करोना झाल्यानंतर तिचा मृत्यू होण्यासाठी करोनाचा शस्त्र म्हणून वापर करून तिला औषधोपचार योग्य वेळी न करून जाणीवपूर्वक तिचा मृत्यू घडवून आणल्याच्या आरोपावरून पतीविरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा झाला होता. आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, सदर जामीन अर्जास प्रखर विरोध करणारे मूळफिर्यादीचे वकीलपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. सारंग वांगीकर, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिध्देश्वर खंडागळे तर आरोपीतर्फे ॲड. मुल्ला यांनी काम पाहिले.

Leave a Reply

error: Content is protected !!