जमिनीचा हव्यास : वयोवृद्ध चुलत्याचा खून

माळशिरस तालुक्यातील घटना : 3 पुतन्यांनी केली मारहाण

माळशिरस : ईगल आय मीडिया

फोडशिरस (ता.माळशिरस ) येथे सामाईक पडवस्ती जमिनीच्या हव्यासापोटी तिन पुतन्यानी चुलत्याचा केला खुन. नाना अप्पा वाघमोडे( वय ७० )असे मयताचे नाव आहे.

फोंडशिरस (ता.माळशिरस ) येथील मयत नाना आप्पा वाघमोडे आपल्या भावांसह ३३ गुंठे सामाईक जागेत राहत होते दोन्ही भावांना प्रत्येकी १८ गुंठे जमीन क्षेत्र वस्तीपड म्हणून मिळाले होते . या वस्तीपड जमिनीवरून नाना वाघमोडे यांचे पुतणे धर्मेंद्र महादेव वाघमोडे, अंकुश महादेव वाघमोडे, किरण महादेव वाघमोडे हे वस्ती सोडून इतरत्र जा, नाहीतर तुम्हाला संपवून टाकू असे म्हणून सतत भांडण करत होते.

मंगळवार (दि. १९ ) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी व मयताचा मुलगा बाबुराव वाघमोडे यांचे भांडण झाले होते. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता मयताचे नातू तुषार आणि नाना वाघमोडे हे घराच्या मागून शेळ्या घेऊन येत असताना किरण, अंकुश, धर्मेंद्र या तिघा पुतण्यानी मिळून नाना वाघमोडे यांच्यावर लोखंडी पाईप च्या साह्याने वार करत डोक्यावर जबर मारहाण केली, यात ते गंभीर जखमी झाले.

जखमीस नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकलुज क्रिटीकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेतील आरोपी किरण महादेव वाघमोडे यास फलटण येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!