पुणे जिल्ह्यातील वराळे (ता.खेड ) येथील घटना
टीम : ईगल आय मीडिया
सुनेच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच सुपारी किलर नी खून केल्याची खळबळजनक घटना वराळे ता.खेड ( जि. पुणे ) इथं घडली आहे. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी दोन सुपारी किलर्स ना पोलिसांनी अटक केली आहे.
विनायक पानमंद यांचा मुलगा ही अजितने पहिले लग्न होऊनही दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह केला होता. याची माहिती वडील विनायक यांना काही महिन्यांपूर्वी कळाली. त्यातून विनायक यांचे मुलगा अजितसोबत खटके उडायला लागले.
त्यामुळे त्यांनी मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला. आणि आरोपी अविनाश बबन राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू आणि मोहम्मद वसीम जब्बार यांना १ लाख ३४ हजारांची सुपारी दिली. आरोपींनी दोन पिस्तुल आणली आणि खुनाचा कटही रचला, परंतु, महिलेचा खून करायचा असल्याने आरोपी घाबरले होते. त्यामुळे खून करायला उशीर लागत होता.
दरम्यान, मयत विनायक यांनी ‘ सुनेचा खून कधी करणार? होत नसेल तर पैसे परत करा,’ असा तगादा आरोपीकडे लावला होता. विनायक हे पैसे परत मागत असल्याने आरोपींनी त्यांना खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला.
या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना पिस्तुलासह अटक केली असून, एकाचा शोध घेत आहेत. अविनाश बबन राठोड आणि मोहम्मद शहजाद इस्लाम अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर, मोहम्मद वसीम जब्बार हा फरार आहे.