सुनेवर बलात्कार ; सासऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी

पंढरपूर जिल्हा सत्र न्यायाधीश एम बी लंबे यांनी सुनावली शिक्षा

पंढरपूर ; eagle eye news
 सुनेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध ठेवले आणि धमकी दिल्याप्रकरणी सासऱ्यास १० वर्षे सक्त मजुरी आणि ५ कलमांसाठी प्रत्येकी ७ हजार ५००  रुपये धमकी दिल्या प्रकरणी २ हजार ५०० रुपये दंड अशी शिक्षा पंढरपूर जिल्हा सत्र न्यायाधीश एम बी लंबे यांनी सुनावली आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आरोपी महादेव दाजी बनसोडे ( रा. चळे, ता. पंढरपूर ) याने १६ एप्रिल २०२१ ते २४ जुलै २०२१ दरम्यान फिर्यादी घरात एकटी असतानाच जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्व शरीर संबन्ध निर्माण केले. तसेच या विषयी कुणास सांगितले तर जगणे अवघड होईल अशी धमकी दिली होती. वारंवार हा प्रकार घडू लागल्याने सुनेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास करून पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांनी कलम ३७६, ३७३ ( २) , ३७६ ( एन ) ३७६ ( फ ) आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. 

या प्रकरणी सुनावणी दरम्यान ७ जणांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या आणि न्यायालयाने आरोपीस प्रत्येक कलमानुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच धमकी दिल्या प्रकरणी २ हजार ५००० दंड ठोठावला आहे. सर्व शिक्षा आरोपीने एकत्र भोगावयाच्या आहेत. दंडाच्या रकमेपैकी २५ हजार रुपये पीडितेस देण्यात यावेत असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत. सरकारी वकील म्हणून ऍड सारंग आराध्ये यांनी काम पहिले. 

Leave a Reply

error: Content is protected !!