दोन अल्पवयीन मुलींसह पित्याची आत्महत्या

टीम : ईगल आय मीडिया

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) गावात दोन मुलींसह पित्याने विहिरीत उडी घेऊन  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र भुजबळ असे वडिलांचे नाव आहेत तर दीक्षा राजेंद्र भुजबळ, ऋतुजा राजेंद्र भुजबळ ही त्या दोन अभागी मुलींची नावे आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


तळेगाव ढमढेरे येथील शेणाचा मळा या ठिकाणी उत्तम भुजबळ यांच्या विहिरीच्या कडेला तिघांच्या चपला आढळल्या. मोठ्या माणसाच्या चपलांसोबत लहान मुलींच्या चपला दिसल्या. त्याच्याबरोबर मोबाईल आणि पैसेही पडल्याचे दिसून आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.


या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मोबाईल, पैसे विहिरीच्या काठावर काढून ठेवून पित्याने लेकींसह जीवनयात्रा संपवली. तिहेरी आत्महत्येच्या घटनेने तळेगाव ढमढेरे गावात एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ बापलेकींच्या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिक्रापूर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. तर पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

One thought on “दोन अल्पवयीन मुलींसह पित्याची आत्महत्या

  1. अत्यंत दुर्दैवी घटना, अशी वेळ कोणावरही येऊ नये.

Leave a Reply

error: Content is protected !!