कुटुंबातील 5 जणांची हत्या करून स्वतः ही केली आत्महत्या

हादरवून टाकणारे नागपुरातील हत्याकांड

टीम : ईगल आय मीडिया

पत्नी, मुलगा आणि मुलीसह सासू व मेहुणी ची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज असून हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत स्वतः आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. नागपुरच्या पाचपावली भागात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दरम्यान घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच पावली भागात राहणारा आलोक माथुरकर याने अगोदर आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथूनच थोड्या अंतरावर असणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीचीही हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घऱी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन आपलेही जीवन संपवलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि 6 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आलोक मातुरकर हा शिलाई काम करत होता. त्याचा संपूर्ण परिवार प्रमोद भिसीकर यांच्या घरी भाड्याने राहत होता. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, केवळ कौटुंबिक वादातून 5 जणांची हत्या आणि स्वत: जीव संपवण्याच्या या प्रकाराचा पोलीस कसून तपास करत आहेत.

रविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याचं समजत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे,

One thought on “कुटुंबातील 5 जणांची हत्या करून स्वतः ही केली आत्महत्या

  1. अत्यंत दुर्दैवी घटना, सखोल तपास होण्याची गरज आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!