दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीस पंढरपुर शहर पोलिसांनी पकडले

3 आरोपी अनवली तर 2 जण गोपाळपूर येथील

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरातील गाताडे प्लॉट, प्रदेधी नगर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांच्या टोळीस शहर पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. पकडलेल्या आरोपी पैकी 3 जण अनवली तर 2 जण गोपाळपूर येथील आहेत.

याबाबत शहर पोलिसांत दाखल माहितीनुसार, 22 जुलै रोजी गोपाळपूर रोडवरील रिद्धी सिद्धी मंदिराजवळ दोन कार संशयास्पद उभा असल्याच्या आणि दरोडा टाकण्याच्या इराद्याने एकत्र आल्याची माहिती मिळाली. स. पो नि राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन कानोसा घेतला असता ते सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी लगेचच त्यांना सापळा लावून पकडले असता त्यांच्या जवळील स्विफ्ट कार मध्ये कोयता, कटवणी, 2 तलवारी, हुक आढळून आले. त्यांना पकडले असताना अंधाराचा फायदा घेऊन एकजण पळून गेला होता. त्यास ही पोलिसांनी आज पकडले आहे. त्यांच्यावर शहर पोलिसांत कलम 402, 399 सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेंद्र मगदूम करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!