नालासोपाऱ्यात नायझेरियन नागरिकांना अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक
टीम : ईगल आय मीडिया
फक्त 750 ग्रॅम कोकेन ची किंमत थक्क करणारी आहे. दीड कोटी रुपये किंमतीच्या पाऊण किलो कोकेनसह नालासोपारा येथे चार नायझेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री नालासोपारा येथील तुळींज परिसरात पोलिसांनी कारवाई करत १.५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत 4 नायाझेरीअन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व परिसरातील प्रगती नगर येथे नायाझेरीयन नागरिकांची वस्ती आहे. या वस्तीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत ७५० ग्राम कोकेन जप्त करण्यात आले असूूून त्याची किंमत तब्बल १.५ कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईनंतर पुन्हा एकदा अंमली पदार्थांच्या तस्करीत नायझेरीयन नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.