गुंडांचा गोळीबार : डीएसपीसह 8 पोलीस शहीद


टीम : ईगल आय मीडिया
कानपुर ( उत्तरप्रदेश ) येथे कारवाईसाठी आलेल्या पोलिसपथकावर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे.
कानपुर येथील गुंड विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे.

दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकात एक सीओ, एक एसओ, 2 एसआय आणि 4 जवान शहीद झाले असल्याचे परिसरातील डीएम यांनी सांगितले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी डीजीपी एचसी अवस्थी यांना दिले असून, त्यांनी घटनेचा अहवालही मागविला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!