गोवा बनावटीची 1440 क्वार्टर दारू पकडली

पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कामगिरी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

अवैधपणे दारूची वाहतूक करणारा एक टेंम्पो पोलिसांनी आज जप्त केला.कारवाई दरम्यान 2 लाख 16 हजार रूपयांच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह 4 लाख 66 हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांनी मुंढेवाडी (ता.पंढरपूर) परिसरात केली.

अवैध दारू वाहतूक प्रकरणी सदानंद दत्तात्रय यादव (रा.घोटी ता.माढा) सज्जन आदिनाथ थोरात (रा.हिवरे ता.मोहोळ)या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बाबतची माहिती अशी की, हिवरे हून (ता.माढा) येथून टाटा माॅझीक टेंम्पो (एम.एच 45 टी-3869) मधून 2 लाख 16 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीच्या 1 हजार 440 क्वार्टरचे (मॅकडाॅल) 30 बाॅक्सची अवैधपणे वाहतूक करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारा टेंम्पो पकडला.

पोलिसांनी टेंम्पोची तपासणी केली असता,आतमध्ये कडब्याच्या आत मॅकडाॅल कंपनीच्या गोवा बनावटीचे 30.दारूचे बाॅक्स आढळून आले. बाॅक्समध्ये 1 हजार 440 क्वार्टर आढळून आल्या.
टेंम्पोसह 4 लाख 66 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई तालुका पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शानाखाली एपीआय आदिनाथ थोरात,पोलिस काॅन्स्टेबल सुधीर शिंदे,सोमनाथ नरळे यांनी ही धाडसी कारवाई केली. संशयित आरोपींना उद्या न्यायालया समोर उभे केले जाणार आहे. तालुका पोलिसांनी लाॅकडाऊन काळातील ही सर्वात मोठी कारवाई केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!