टीम : ईगल आय मीडिया
सांगली जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकालाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेला हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला.
एका पोलिस निरीक्षकासह 6 जणांना अटक करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त असुन दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. मात्र अद्याप पोलिस प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात कर्नाळ रोडवरील ‘हॉटेल रणवीर’वर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस निरीक्षकाला बेड्या घातल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये संबधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, हॉटेल मालक, एजंट यांचाही समावेश आहे. हॉटेलमधील छापेमारीत दोन तरुणीही सापडल्या. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.