हिंजवडी आय टी पार्कमध्ये 25 किलो गांजा जप्त

टीम : ईगल आय मीडिया

हिंजवडी येथील आय टी पार्कात चक्क 25 किलो गांजा जप्त करण्यात आल्याने आय टी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आय टी क्षेत्रातही अमली पदार्थ विक्री आणि सेवन सुरू असल्याचे उघड झाले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यामधील हिंजवडीतील ‘आयटी हब’मध्ये ६ लाख ४० हजार किलो रुपयांचा २५ किलो गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गांजा जप्त केला आहे. त्या तरुणाचे नाव योगेश्वर गजानन फाटे (वय- 23, रा. जनता वसाहत, गोखलेनगर, पुणे) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी फेज दोन येथे पुण्यातील एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला अन् अंमली पदार्थ पथकाने योगेश्वर गजानन फाटे ( रा. गोखले नगर ) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळील बॅगेत ६ लाख ४० हजार रुपयांचा २५ किलो ६०६ ग्रॅम गांजा मिळाला.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शाकिर जेनेडी आणि संदीप पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!