10 लाखांची लाच घेताना आयकर अधिकारी अटकेत

भर चौकात पकडले रंगेहाथ : कोल्हापूर येथील खळबळजनक गुन्हा

टीम : ईगल आय मीडिया

१० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. टाकाळा येथील आयकर निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण (वय-३५) असे या अधिकार्‍याचे नाव आहे.

याबाबत एका होमिओपॅथी डॉक्टरांनी सन २०१२ पासून प्राप्तिकर भरला नव्हता. याबाबत एक निनावी तक्रार आली होती. त्यावरून चव्हाण याने डॉक्टरांना 50 लाख रुपये दंड होईल असे सांगितले आणि छापा न टाकण्यासाठी चव्हाण यांनी त्यांच्याकडे 20 लाख रुपये लाचेची मागणी केली होती.


तडजोड करून १४ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार त्यातील दहा लाख रुपयांची रक्कम आज लक्ष्मीपुरी येथील विल्सन पुलावरील रस्त्यावर ही रक्कम स्वीकारत असताना चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. अशी माहिती या विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!